Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अनुदान योजना : मधाळ गोडवा आणायला मिळतेय ५० टक्के अनुदान; तत्काळ अर्ज करा की

Please wait..

अहमदनगर : करोना संकटाने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. अशा मंडळींनी आता व्यवसायाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्याची तयारी केली आहे. त्यातील काहींना आता मधाळ गोडवा आणण्याच्या योजनेसाठी तब्बल ५० टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठीचे अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे.

Advertisement
Loading...

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मेडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. याकरिता पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागवले जात आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Advertisement
पात्रतेचे निकष आणि महत्वाचे मुद्दे असे :
वैयक्तिक मधपाळ योजनेसाठी पात्रता अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
केंद्र चालक प्रगतशिल मधपाळ संस्था किंवा व्यक्ती, वैयक्तिक केंद्रचालक (प्रगतशील मधपाळ) असावा. पात्रता किमान दहावी पास, वय वर्षे २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थ्याकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
मधकेंद्र योजनेच्या निकषाप्रमाणे निवडीनंतर ५० टक्के रक्कम भरल्यानंतरच मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असेल. ५० टक्के स्वगुंतवणूक झाल्यानंतर प्रशिक्षण चालू होण्याअगोदर भरावी लागेल.

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply