Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक परिस्थिती होत आहे की; पहा भाव कमी झाल्याने गृहिणींना मिळालाय दिलासा

दिल्ली : देशात सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी मिळाली आहे. काही दिवसांपासून डाळींच्या किमती वाढत होत्या. आता मात्र डाळींच्या किमती जवळपास 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. उडीद आणि हरभरा डाळींच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

Advertisement

कोरोना काळात डाळींचे दर कमी झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. चना डाळींचे दर 5100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी झाले आहेत. कोरोना काळात डाळींना मागणी कमी आहे, त्यामुळे दर कमी झाले आहेत. मध्यंतरी डाळीचे दर खूप वाढले होते, त्यामुळे सुद्धा मागणी घटली. त्याचा परिणाम म्हणून आज डाळींच्या किमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. भारतीय डाळ आणि धान्य असोसिएशनचे अध्यक्ष जितू भेडा म्हणाले की कोविडमुळे मागणीत घट झाली आहे. नाफेडने सुद्धा हरभरा विक्रीस सुरुवात केली आहे, या कारणांमुळे किमती कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जारी केलेल्या निर्बंधांमुळे सुद्धा डाळींच्या मागणीत घट नोंदवण्यात आली आहे. हरभरा आणि उडीद डाळींप्रमाणेच तूर आणि मूग डाळींच्या किमती सुद्धा कमी झाल्या आहेत. साधारण 15 मे पासून उडीद डाळींच्या किमती 20 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सध्या देशातील महानगरांमध्ये उडीद डाळींच्या किमती 67 हजार रुपये प्रति टन आहेत.

Advertisement

दरम्यान, देशात कोरोनाचे संकटात महागाईने त्रास देण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. खाद्यतेलांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. अजूनही इंधनाचे दर वाढतच आहेत. घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. सध्या अशीच परिस्थिती कायम राहिली तर या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी डाळींच्या किमती मात्र कमी झाल्या आहेत. त्यामुळे या संकटाच्या दिवसांत नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply