‘त्या’ इन्व्हेस्टर्सना दिलासा; पहा कोणत्या निर्णयावर मोदी सरकार फिरले माघारी आणि झालाय फायदा..!
दिल्ली : केंद्र सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय याआधी घेतला होता. मात्र, या निर्णयास जोरदार विरोध झाल्याने काही तासातच हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर रखडलेला हा निर्णय १ जुलैपासून अंमलात येणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. आता मात्र केंद्र सरकारने हा संभ्रम दूर करत नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारने या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे या कमी कालावधीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही.
याआधी एप्रिल महिन्यातच सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी या निर्णयास जोरदार विरोध झाला. त्यावेळी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत्या, याचा फटका निवडणुकीत बसू शकतो असा विचार करुन सरकारने काही तासातच हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा केंद्राचा विचार आहे, अशा चर्चा होत्या. सरकारने हा निर्णय अंमलात आणला असता तर गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असते.
आता मात्र सरकारने असा विचार सध्या तरी टाळला आहे. अल्प बचत योजनांच्या व्याजदरात या तिमाहीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी योजनांचे व्याजदर स्थिर राहणार आहेत. सरकारकडून दर तिमाहीस अल्प बचत योजनांचे व्याजदरांचा आढावा घेण्यात येतो. यावेळी व्याजदर कमी किंवा जास्त करण्याचा निर्णय घेतला जातो. अल्प बचत योजनांमध्ये पोस्टाच्या योजना जास्त प्रसिद्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे सुरक्षित असतात, आणि व्याजदर सुद्धा चांगला असतो. त्यामुळे कमी कालावधीच्या बचतीच्या योजना असतील तर नागरिक पोस्टाला प्राधान्य देतात.
दरम्यान, केंद्र सरकारने योजनांचे व्याजदर कायम ठेवल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या संकटाच्या काळात लोकांना आधीच पैशांची चणचण जाणवत आहे. कोरोना काळात तर अनेक जणांना या समस्येचा सामना करावा लागला. या संकटाच्या काळात जर व्याजदर कपातीचा निर्णय घेतला गेला असता नागरिकांचे नुकसान झाले असते. या गोष्टींचा विचार करुन केंद्र सरकारने यंदा व्याजदर स्थिर ठेवले आहेत.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.