Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ, कामगारांचा होणार ‘असा’ फायदा..!

मुंबई :  मागील वर्षी कोरोनामुळे मरगळ आलेल्या उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेच्या विस्तारासाठी 28 जून रोजी आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

Advertisement

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची डेडलाईन पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे उद्याेगाच्या रजिस्ट्रेशनची अंतिम रारीख 30 जून 2021 ऐवजी आता 31 मार्च 2022 झाली आहे. त्यात 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचारी-कामगारांचा मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

भारत रोजगार योजनेचा (ABRY) तिसरा टप्पा लॉन्च करण्यात आला आहे. या अंतर्गत 12 नव्या योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्व क्षेत्रांचा यात समावेश आहे. योजनेसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने 27.1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के आहे.

Loading...
Advertisement

केंद्र सरकारच्या या योजनेनुसार रजिस्ट्रेशनची तारीख वाढवल्यामुळे औपचारिक क्षेत्रात 71.8 लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. योजनेचा अंदाजे खर्च वाढून 22 हजार 98 कोटी रुपये झाला. एबीआरवाय नुसार ईपीएफोमध्ये नोंदणीकृत आस्थापना आणि त्यांचे 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या नव्या कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Advertisement

ABRY नुसार केंद्र सरकार कर्मचारी आणि मालकांचे अंश (उत्पन्नाच्या 24 टक्के) किंवा कर्मचाऱ्यांचा अंश (उत्पन्नाच्या 12 टक्के) ची रक्कम दोन वर्षांपर्यंत प्रदान केली जाईल. मात्र, हे EPFO नोंदणीकृत कंपन्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून आहे. ABRY नुसार 18 जून 2021 पर्यंत 79 हजार 557 कंपन्यांद्वारे 21. 42 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply