Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जादा परताव्याची संधी..! ‘या’ याेजनांतून ज्येष्ठ नागरिकांना मिळेल घसघशीत पैसा, जाणून घेण्यासाठी वाचा..

पुणे : नोकरीतून सेवानिवृत्त होताना अनेक जण आपल्या आयुष्याची पूंजी कुठेतरी गुंतवतात. म्हातारपणात आर्थिक चणचण भासू नये, याची तजवीज करुन ठेवतात. काही जण आपल्या पैसे एफडीमध्ये ठेवतात, पण आता एफडीचे व्याजदर 5 ते 6 टक्क्यापर्यंत खाली आहेत. त्यामुळे त्यातून जादा परतावा मिळत नाही. अशा वेळी नेमकी कुठे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, याबाबत जाणून घेऊ या.

Advertisement

 सिनीअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS)

Advertisement

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा (Senior Citizen Saving Scheme ) कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. या योजनेत एकापेक्षा जास्त खाते उघडता येतात; पण त्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. एप्रिल ते जून या तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याज 7.4 टक्के आहे; पण त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो.

Advertisement

 प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)

Advertisement

प्रधानमंत्री वंदना योजनेची (Pradhan Mantri Vandana Yojana) मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढविली आहे. त्यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट कमीत कमी 60 वर्षे आहे. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या योजनेत 7.40 टक्के व्याज मिळाले. प्रत्येक वर्षी योजनेचा व्याजदर निश्चित केला जातो. या योजनेतही 15 लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करता येते. 10 वर्षांच्या पॉलिसीच्या मुदतीनंतर गुंतवणुकदाराला गुंतवणूकीची रक्कम आणि अंतिम पेन्शनचे हप्ते मिळतात.

Advertisement

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS)

Loading...
Advertisement

या योजनेचा (Post Office Monthly Income Scheme) काळ 5 वर्षांचा असून,  त्यात एकदा ठरलेला व्याजदर शेवटपर्यंत कायम राहतो. जूनच्या तिमाहीत संपलेल्या योजनेचा व्याजदर 6.6 टक्के होता. या योजनेत एका खात्यात जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये ठेवता येतात.  जॉईंट अकाउंटमध्ये 9 लाख रुपये जमा करता येतात.

Advertisement

मुदत ठेव (FD)

Advertisement

मागील काही दिवसांपासून या योजनेची (Fixed Diposit) प्रसिद्धी कमी होत असली, तरी याला सर्वात मोठी ‘लिक्विड इनवेस्टमेंट’ मानले जाते. या योजनेचा कालावधी सात दिवस ते दहा वर्षे असू शकतो. या योजनेतील व्याज मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर दिले जाते. सध्या कोणतीही सामान्य बँक एफडीवर सहा टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत नाही. ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के जास्त व्याज मिळते. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एफडी सुरू करत आहेत.

Advertisement

फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड

Advertisement

2020च्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्डचा (Floating Rate Savings Bonds) कालावधी सात वर्षांचा आहे. दरवर्षी त्याचे व्याजदर बदलतील. त्याचा पहिला कूपन दर (1 जानेवारी, 2021 रोजी देण्यात आला आहे) 7.5 टक्के होता. कूपन दर / व्याज दर दर वर्षी 1 जुलै आणि 1 जानेवारी रोजी निश्चित केला जातो. हा कूपन दर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) च्या सध्याच्या व्याज दराशी जोडलेला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply