Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला पुन्हा झळाळी.. चांदीची चमकही वाढली..! सराफा बाजारातील आजची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा….

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात परतलेली तेजी आणि कमजोर झालेल्या रुपयामुळे भारतीय सराफा बाजारात आज (ता. 1 जुलै) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच, चांदीच्या किंमतीतही मोठी तेजी पाहायला मिळाली.

Advertisement

आधीच्या सत्रात सोन्याचे दर दिल्लीतील सराफा बाजारात 45,784 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाले होते. चांदीचे दर प्रति किलो  67,423 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली, तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

Advertisement

दिल्लीतील सराफा बाजारात आज (गुरुवारी) सोन्याचा भाव 526 रुपयांनी वाढला. त्यामुळे दिल्लीत 99.9 शुद्ध सोन्याचा भाव 46,310 रुपये प्रति तोळा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1,778 डॉलर प्रति औंसवर गेले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य आज 5 पैशांनी कमजोर होऊन 74.37 च्या स्तरावर पोहोचले.

Loading...
Advertisement

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात 1231 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचा दर 68,654 रुपये प्रति किलोवर गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चांदीच्या दरात विशेष बदल झाले नाहीत. चांदीचे दर 26.25 डॉलर प्रति औंसवर होते.

Advertisement

न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर सोन्याच्या किंमतीत तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात स्पॉट गोल्डच्या किंमती उतरल्याची माहिती एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply