Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नीरव मोदीच्या बहिणीने मोदी सरकारला पाठवले 17 कोटी रुपये..! ईडीची माहिती.. नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी वाचा..

Please wait..

नवी दिल्ली : भारतीय बॅंकांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदी याच्या बहिणीने मोदी सरकारला यूकेच्या बँक खात्यातून तब्बल 17 कोटी रुपये पाठवल्याचे समोर आले आहे. दस्तुरखुद्द सक्तवसुली संचलनालय, अर्थात ईडीनेच (Directorate of Enforcement) ही माहिती दिलीय.

Advertisement

नीरव मोदी याची बहिण पूर्वी मोदी हिने मोदी सरकारच्या बँक खात्यात हे 17 कोटी रुपये पाठविले आहेत. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्याच्या (PNB Scam) चौकशीत सहकार्य केल्यास, त्याच्याविरोधात कोणतीही क्रिमिनल कारवाई केली जाणार नसल्याची ग्वाही मोदी सरकारने पूर्वी मोदी हिला दिली होती.

Advertisement
Loading...

पूर्वी मोदी हिने 24 जून रोजी ईडीला (ED) याबाबत माहिती दिली होती. लंडनमध्ये पूर्वीचा भाऊ नीरव मोदी याने पूर्वी हिच्या नावे बँक अकाउंट सुरू केले होते. मात्र, त्यातील पैसे त्यांचे नसल्याचे पूर्वीने सांगितले होते. त्यावेळी कबुल केल्याप्रमाणे पूर्वी मोदी हिने त्या खात्यातील 23 लाख 16 हजार 889 डॉलर, अर्थात जवळपास 17.25 कोटी रुपये मोदी सरकारच्या खात्यावर पाठविले आहेत.

Advertisement

https://platform.twitter.com/widgets.js

Advertisement

मुंबईतील ब्रॅडी हाऊस पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) शाखेत 2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी सध्या युकेच्या तुरूंगात आहे. त्याने भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबतची याचिका दाखल केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply