Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कृषी विभागाच्या ‘त्या’ त्रिसूत्रीचा होतोय फायदा; उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलाय दावा

नाशिक : कृषी विभागाच्या अनास्थेचा फटका वेळोवेळी शेतकऱ्यांना बसत असतो. मात्र, त्याबाबत कबुली देऊन सुधारणा करण्याचे कार्य करण्याचे महाराष्ट्र शासन करीत नाही. उलट आपल्याच विभागाला आपलेच प्रमाणपत्र वाटण्याचा उद्योग राजकीय नेते, मंत्री व अधिकारी करतात. आताही कृषी दिनाच्या निमित्ताने असेच प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन टाकले आहे.

Advertisement

शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आणि अनुभवाला तंत्रज्ञानाचा जोड मिळाल्यास त्याचा नक्की फायदा होईल. कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून त्याला सुरुवात झाल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रीचा वापर करीत कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

तर, प्रयोगशिल शेतकरी हे स्वतंत्र विद्यापीठ असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. उत्पादकता वाढल्यास शेती परवडणारी होऊ शकते. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणारे कृषीमंत्री दादाजी भुसेंच्या माध्यमातून लाभले असून ते मनापासून काम करीत असल्याचे मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचे अनुभव शब्दबद्ध आणि चित्रीत करुन ते राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply