Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अवघा भारत अडकत चाललाय कर्जबोजात; पहा किती लोकांची झालीय आर्थिक कोंडी

मुंबई : करोना कालावधीच्या अगोदरच नोटबंदी (Note Ban), जीएसटी (GST) आणि इतर अनेक उलटसुलट निर्णयाचा फटका बसून भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) कोंडीत सापडली होती. त्यात आरोग्याच्या संकटाच्या फटक्यात भारतीय अर्थवृद्धीचा दर थेट उणे झाला. दीड वर्षात सरकारने कोट्यावधी रुपयांच्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात काहीही फरक न पडल्याचा फटका अवघ्या देशाला बसला आहे.

Advertisement

साथीच्या रोगाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच लोकांच्या खिशावर झाला आहे. नोकर्‍या गमावल्यामुळे व उत्पन्नाच्या अडचणीमुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीच्या (सीआयसी) अहवालानुसार देशातील सुमारे 40 कोटी काम करणाऱ्या लोकसंख्येपैकी निम्मे लोक कर्जबाजारी आहेत. त्यांनी खर्चाची पूर्तता करण्यासाठी किमान एकदा कर्ज (Bank Loans) घेतले असेल किंवा कर्जासाठी क्रेडिट कार्ड वापरले असेल अशांची ही संख्या आहे.

Advertisement

अहवालात म्हटले आहे की, जानेवारी 2021 पर्यंत देशातील एकूण लोकसंख्या 40.07 कोटी होती. यापैकी 20 कोटी लोकांनी किरकोळ कर्जाच्या बाजारपेठेतून काही स्वरूपात कर्ज घेतले आहे. ट्रान्स युनियन सिबिलच्या मते, कर्ज देणाऱ्या संस्था आता नवीन ग्राहकांपर्यंत आपली पोहोच विस्तारत आहेत. कारण निम्म्याहून अधिक जुने कर्जदार त्यांचे विद्यमान ग्राहक आहेत. खासगी सावकारी व उसनवारी कर्ज यांचा आकडा तर यापेक्षाही मोठा असू शकतो.

Loading...
Advertisement

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, मार्च 2021 मध्येच वैयक्तिक कर्जात (Personal Loan) 13.5% वाढ झाली आहे. परंतु औद्योगिक कर्जाची (Industrial Loan) मागणी कमी राहिली आहे. खाजगी बँकांनी (Private Bank) मार्च तिमाहीत सर्वाधिक कर्ज वितरित केले असून एकूण कर्जाच्या 36.5% इतकी ती रक्कम होती. मागील वर्षी ती 35.4% आणि पाच वर्षांपूर्वी 24.8% होती. गृहकर्जामध्येही (Home Loan) तुलनेत 10.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

आताही ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील 18 ते 33 वर्षे वयोगटातील कामदार लोकांपैकी अनेकांकडे कर्ज वाढीची शक्यता जास्त आहे. कारण या वर्गवारीत कर्जाचे प्रमाण 8 % आहे. महिला कर्जदारांचा वाटा ऑटो लोनमध्ये (Auto / Car / Motorcycle / Two Wheeler Loan) 15 %, कन्झुमर लोनमध्ये (Consumer Loan) 25 % आणि  पर्सनल लोनमध्ये 22% आणि गृह कर्जात 31% आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply