Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारने कटू निर्णय घेतलाच..! गॅसच्या दरात भली मोठी वाढ, महागाई आवाक्याबाहेर..!

नवी दिल्ली : मोदी सरकारने अखेर तो कटू निर्णय घेतलाच.. किमान काही दिवस तरी हा निर्णय होणार नाही, असे वाटत होते. मात्र, मोदी सरकारने अखेर ग्राहकांना झटका दिलाच.. हा निर्णय म्हणजे, गॅस दरवाढीचा.. जुलैच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले.

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी कधीच शंभरी पार केल्याने जनता हैराण झालेली असताना, सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती व कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर आता तब्बल 25.50 रुपयांनी महागला आहे, तर कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 84 रुपयांची वाढ करण्यात आली.

Advertisement

दिल्लीत आता घरगुती एलपीजी गॅस (LPG Gas Cylinder) सिलिंडरचा दर 809 रुपयांवरुन 834.50 रुपये झाला. देशातील विविध शहरांत आजपासूनच (ता. 1 जुलै) नव्या किमती लागू झाल्या आहेत. याआधी 1 जून रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते.

Advertisement

जूनमध्ये 19.2 किलो कमर्शियल सिलिंडरचे दर 122 रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर कमर्शियल सिलेंडर 1473.50 रुपये इतका होता, तर जूनमध्ये घरगुती सिलेंडरचा दर जैसे थे होता. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅस सिलेंडरचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

घरगुती गॅसच्या किमतीत 2021 मध्ये सर्वाधिक वाढ झाली. जानेवारी सोडता जवळपास सर्वच महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. 4 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा 50 रुपयांनी वाढ झाली.

Advertisement

1 मार्च रोजी गॅस सिलिंडरचा दर पुन्हा एकदा 25 रुपयांनी वाढविण्यात आला. नंतर एप्रिलमध्ये 10 रुपयांनी किमती कमी करण्यात आल्या होत्या.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्यालेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलोसबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply