Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गावोगावी दिसणार इंटरनेटचा जलवा..! मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा गावकऱ्यांचा काय फायदा होणार..?

नवी दिल्ली : देशातील सहा लाख गावांना एक हजार दिवसांत ब्रॉडबँड सेवेशी जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी केली होती. त्यानुसार मोदी सरकारने बुधवारी (ता.30) टेलिकॉम सेक्टरबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ‘भारतनेट प्रोजेक्ट’साठी 19041 कोटी रुपयांच्या अलॉटमेंटसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

Advertisement

कॅबिनेटने 16 राज्यांतील गावांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत भारतनेट कार्यान्वयन धोरणाला परवानगी दिली आहे. केंद्रीय संपर्क व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

Advertisement

देशातील 16 राज्यांतील 3,60,000 गावात ब्रॉडबँड सुविधेशी जोडण्यासाठी 29,430 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.  त्यात सरकार 19,041 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. ही योजना व्यावहारिक करण्यासाठी सरकार हा निधी सहाय्य म्हणून देईल.

Loading...
Advertisement

मोदी सरकारच्या घोषणेनुसार, या योजनेत खासगी क्षेत्रातील कंपन्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत अडीच लाख पैकी 1.56 लाख पंचायती ब्रॉडबँड सेवांशी जोडल्या गेल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या निर्णयांना मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply