Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अडचणीत वाढ.. तब्बल ७० कोटींचा किराणा घोटाळा; चाललेय तरी काय महाराष्ट्रात..!

नाशिक : एकीकडे कांदा घोटाळाप्रकरणी चर्चा जोरात असतानाच आता महाराष्ट्र राज्यात आणखी एक घोटाळा उघडकीस आलेला आहे. होय, तो घोटाळा आहे किराणा घोटाळा. ११०० रुपयाचे अन्नधान्याचे कीट २००० रुपयांना खरेदी करून तब्बल ७० कोटींचा गैरव्यवहार केला जात असल्याचे नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे सर्वच आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत.

Advertisement

आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे व नितीन पवार यांचे म्हणणे आहे की, आदिवासी विकास महामंडळ एका किराणा अन्नधान्य कीटसाठी ठेकेदारास १,९८३ रुपये देत आहे. मात्र, आताच्या बाजारभावानुसार याची किंमत १,२१५ असून यात पँकिंग व वाहतूक खर्चासह १,२७० रुपये इतक्या रकमेला हे कीट पडते. मग प्रतिकिट ७१२ रुपये अतिरिक्त देण्यात येतात ते कोणाचे असा कळीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

योजनेबद्दल माहिती : राज्यातील ११ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी ४ हजार रुपये या प्रमाणे ही खावटी योजनेची मदत जाहीर झालेली आहे. यातील २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करून उरलेले २ हजार रुपयांचे अनुदान शिधा स्वरुपात देण्याचे ठरले आहे. त्यात मटकी, चवळी, वाटाणा, उडीदडाळ, शेंगदाणा तेल, मिरची पावडर प्रत्येकी १ किलो, तूरदाळ २ किलो, साखर, मीठ प्रत्येकी ३ किलो, चहा पावडर ५०० ग्राम, गरम मसाला ५०० ग्रँम असे किरण साहित्य असेल.

Loading...
Advertisement

याबद्दल बोलताना आमदार हिरामण खोसकर म्हणाले आहेत की, निविदा प्रक्रिया पारदर्शी व स्पर्धात्मक होण्यासाठी आम्ही वेळोवेळी आदिवासी विकास मंत्र्यांना लेखी पत्र देऊनही फायदा झाला नाही. आदिवासींच्या हितापेक्षा पुरवठादारांच्या फायद्यासाठी ही निविदा अंतिम करण्यात आली आहे. अधिवेशनात राज्यातील २५ आमदार यास विरोध करणार असून निविदा रद्द करून आदिवासींच्या खात्यावर थेट ४ हजार रुपये या प्रमाणे खावटी अनुदान वर्ग करावे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply