Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मार्केट अपडेट : पहा आज कोणत्या शेअरने दिलीय कमाई करून, तर कोणी खाल्ली आपटी

मुंबई : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढत असताना शेअर बाजारात सुद्धा खळबळ उडाली होती. आता मात्र दुसरी लाट आटोक्यात आली आहे. तसा शेअर बाजारही सावरला आहे. आज बुधवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली. यावेळी सेन्सेक्स ३०० तर निफ्टी ७५ अंकांनी वधारला आहे.

Advertisement

बँकिंग क्षेत्रात इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, सीबीएस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी बँक या शेअरमध्ये वाढ झाली. तर आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर घसरल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाले आहेत. तसेच देशात कोरोना आटोक्यात येत असून लसीकरण मोहिम सुरू आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

Advertisement

सध्या सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला असून ५२८१९ अंकांवर ट्रेंड करत आहे. निफ्टी ७५ अंकांच्या वाढीसह १५८२१ अंकांवर ट्रेंड करत आहे. शेअर बाजारात आज तेजी होती, त्यामुळे गुंतवणूकदारांनी तब्बल ५० हजार कोटी रुपये कमाई केली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, कोरोना संकटात देशाचे मोठे नुकसान झाले. असे एकही क्षेत्र नसेल ज्यास या संकटाचा फटका बसला नसेल. या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेस सुद्धा मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार सुद्धा यास अपवाद नाही. या संकटात शेअर बाजार सुद्धा भरडला गेला. या काळात शेअर बाजार हेलकावे खात होता. कधी जास्त तर कधी कमी अशी परिस्थिती होती. आता मात्र, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर शेअर बाजार सावरला आहे. या क्षेत्रास कोरोनाचा फारसा फटका बसलेला दिसत नाही. कारण, शेअर बाजाराची घोडदौड सुरू आहे. आता देखील बाजारात तेजी दिसून येत आहे. कारण, वर्षभराच्या काळात काही कंपन्यांच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply