Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘हिरो’ बनणेही झालेय महाग; मोजावे लागणार ‘इतके’ जास्त पैसे..!

मुंबई : देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून नावाजलेल्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने ग्राहकांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या दुचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचे आधीच ठरवले होते. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचा मोठा झटका सर्वच भारतीयांना बसणार आहे.

Advertisement

या निर्णयामुळे कंपनीच्या सर्वच मॉडेल्सची किंमत साधारण 3 हजार रुपयांनी वाढणार आहे. याआधी मार्च महिन्यात दुचाकींची किंमत 2500 रुपये वाढ केली होती. त्यानंतर आता तीन महिन्यांनंतर पुन्हा दरवाढ केली आहे. काही दिवसांपासून उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकांना आता या कंपनीची वाहने खरेदी करायची असतील तर जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. या व्यतिरिक्त देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने चारचाकी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दरम्यान, वाढते प्रदूषण आणि वाढत जाणारे इंधनाचे भाव आणि कंपन्यांकडून वाहनांच्या दरात वाढ होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या संकटातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळेच तर आता इलेक्ट्रीक वाहनांचा स्वस्त आणि परवडणारा पर्याय समोर आला आहे. होय, यामागे कारणही तसेच आहे. एकतर सरकारने आता या वाहनांना प्राधान्य देण्याचे निश्चित केले. त्यामुळे या वाहनांची विक्रीत वाढ होण्यासाठी काही निर्णय सुद्धा घेतले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटीत मोठी कपात केली आहे. या वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. काही नियमातही बदल केले आहेत, त्यामुळे ही इलेक्ट्रिक वाहने आता अधिक स्वस्त होणार आहेत. सरकारने काही नियमात सुद्धा बदल केला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर जास्त अनुदान मिळेल. याआधी इलेक्ट्रिक दुचाकीसाठी प्रति KWH 10 हजार रुपये अनुदान मिळत होते.

Loading...
Advertisement

सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर दुचाकी कंपन्यांनी किमती कमी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिव्हिएस कंपनीने TVS iQube या इलेक्ट्रॉनिक स्कुतरची किंमत कमी केली आहे. तर Okinawa कंपनीने Okinawa ipraise+ या दुचाकीची किंमत कमी केली आहे. Revolt Motors कंपनीच्या RV 400 इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या किमतीत सुद्धा मोठी कपात करण्यात आली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply