Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

इतकेही सोप्पे नाही ‘ते’; कारण करावा लागणार 15 हजार कोटींपर्यंत खर्च..!

दिल्ली : आम आदमी पार्टीने पंजाबातील नागरिकांना असेच एक आश्वासन दिले आहे. राज्यात जर पक्षाचे सरकार आले तर राज्यातील प्रत्येक कुटुंबास 300 युनिट वीज पुरवठा मोफत करण्यात येईल, असे आश्वासन पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. राज्यात जर आम आदमी पक्षाचे सरकार आले तर या घोषणेची अंमलबजावणी करण्यास तब्बल 5 हजार कोटी रुपये इतका खर्च येण्याचा अंदाज आहे. सध्याच्या काळात राज्य सरकारकडून विजेसाठी 10 हजार 668 कोटी रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यात जर 300 युनिट मोफत वीज पुरवठा केला तर हा आकडा 15 हजार कोटींपर्यंत वाढेल.

Advertisement

देशात पुन्हा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पुढील वर्षात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाबसह अन्य काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मतदारांना आश्वासने धडाका सुरू झाला आहे. राज्यात सध्या 80 लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. यातील 50 टक्के लोकांना आधीच अनुदान देण्यात येत आहे. जर राज्यात केजरीवाल सरकार आले तर प्रत्येकास अनुदान मिळेल. सध्याच्या स्थितीत 6 हजार 735 कोटी रुपये वीज अनुदान देण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, राजधानी दिल्लीत सध्या 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा केला जात आहे. 201 ते 400 युनिटपर्यंत 50 टक्के अनुदान मिळत आहे. दिल्लीत जवळपास 47 लाख वीज कनेक्शन आहेत, या सर्वांना अनुदान देण्यासाठी दिल्ली सरकारला जवळपास 1700 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी मंडळी घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचा विचार केला तर यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते. आताही आपने निवडणुकीचा विचार करून मोफत वीजपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त थकीत वीज देयके माफ करणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे. राज्यात जर आपचे सरकार आलेच तर या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील, हे मात्र नक्की.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply