Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी…! सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार, पाहा राज्य सरकारने काय निर्णय घेतलाय…?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना जुलैच्या वेतनासोबत दिली जाणार आहे.  तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ऑगस्टच्या पगारासोबत दिला जाईल. जिल्हा परिषद, अनुदानित शाळा आणि अन्य अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची थकबाकीची रक्कम सप्टेंबरमध्ये पगारासोबत देण्यात येणार आहे.

Advertisement

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीन अदा करण्यात येणार आहे.

Loading...
Advertisement

१ जून २०२० ते शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले असतील, किंवा ज्यांचा मृत्यू झाला असेल, अशांना वेतनाच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा केली जाणार आहे.

Advertisement

भविष्य निर्वाह निधी योजना खात्यात जमा करण्यात आलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम १ जुलै २०२० पासून दोन वर्षे म्हणजे ३० जून २०२२ पर्यंत काढता येणार नसल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ रोजी देणे असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता स्थगित ठेवण्यात आला आहे. थकबाकीचा तिसरा हप्ता देण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply