Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच की.. गल्लीपासून दिल्लीही होणार टेक्नोसॅव्ही; पहा मोदी सरकारचे काय आहे प्लानिंग

Please wait..

दिल्ली : काही वर्षांपूर्वी इंटरनेट, स्मार्टफोन हे शब्दही कुणाला माहित नव्हते. आज मात्र या दोन गोष्टी नसतील तर… असा विचार करणे सुद्धा शक्यच नाही, असा सध्याचा काळ आहे. खिशात स्मार्टफोन नाही, असा माणूस क्वचितच सापडेल. नुसता फोन असून काय उपयोग, इंटरनेट पाहिजेच ना…

Advertisement

त्यामुळे आज भारतात इंटरनेटचे वापरकर्ते वेगाने वाढत आहे. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा इंटरनेटचे जाळे विस्तारत आहे. सरकारने सुद्धा गावे आधिक टेक्नोसॅव्ही करण्याच्या उद्देशाने खास रणनिती तयार केली आहे. भारतनेट प्रकल्पांतर्गत देशातील जवळपास सर्व गावांना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन सुविधा देण्यासाठी आणखी १९ हजार ०४१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कॅबिनेट आणि सीसीईएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतनेट प्रकल्पासाठी १९ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Loading...

भारतनेट प्रकल्पाचा दुसरा आणि अंतिम टप्पा २०१७ मध्ये सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत अतिरिक्त १० लाख किलोमीटर अतिरिक्त ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून दीड लाख पंचायत जोडणी आणि दूरसंचार कंपन्यांना साधारण ७५ टक्के स्वस्त दरात ब्रॉडबँड आणि वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी ऑगस्ट २०२० मध्ये देशातील सर्व गावे एक हजार दिवसात ब्रॉडबँडने जोडली जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने कार्यवाहीस सुरूवात केली. २०१७ मध्ये भारतनेट प्रकल्पाचा दुसरा आणि अंतिम टप्पा सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी सरकारने पुन्हा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता लवकर पूर्ण होईल आणि गावे सुद्धा स्मार्ट होतील, असे अपेक्षित आहे.

Advertisement

दरम्यान, ३१ मे पर्यंत देशातील १ लाख ५६ हजार २२३ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड नेटवर्कसोबत जोडण्यासाठी ४२ हजार ०६८ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर आता पुढील टप्प्यासाठी आणखी १९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Advertisement

देशात सन २०२५ पर्यंत शहरांच्या तुलनेत गावात इंटरनेट युजर्सची संख्या जास्त असेल असे एका अहवालात म्हटले आहे. इंटरनेट कंपनी आयएमएआय आणि सहयोगी कंपनी kantar ने एक सर्वे केला होता. यामध्ये असे दिसले, की ग्रामीण भागात अगदी लहान खेड्यात सुद्धा प्रत्येक ५ व्यक्तींपैकी २ जण इंटरनेट वापरतात. आजमितीस देशाच्या १४३ कोटी लोकसंख्येपैकी ६२.२ कोटी लोक इंटरनेट वापरत असल्याचे या सर्वेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply