Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रिझर्व्ह बॅंकेचा चार बॅंकांवर कारवाईचा बडगा, पाहा गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार..?

मुंबई : नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चार सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.  आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याने या बॅंकांवर मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने मंगळवारी (29 जून) हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला 112.50 लाखांचा दंड केला. तसेच अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला 62.50 लाख रुपये, मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेस 37.50 लाख, तर मुंबईच्याच सारस्वत सहकारी बँकेला 25 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

Advertisement

आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने ‘ठेवीवरील व्याजदर’ आणि ‘आपले ग्राहक ओळखा’ या याेजनेत ‘आरबीआय’च्या निर्देशांचं पालन न केल्याचे आढळून आले. तसेच अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेनेही ‘ठेवीवरील व्याजदरा’वरील निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला.

Loading...
Advertisement

मुंबईतील एसव्हीसी सहकारी बँकेने ‘ठेवीवरील व्याजदर’ आणि ‘फसवणुकीचे निरीक्षण व अहवाल देणारी यंत्रणा’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितलं. ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘ठेव खाती देखभाल’ निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सारस्वत सहकारी बँकेला दंड आकारण्यात आला.

Advertisement

नियामक अनुपालनातील कमतरतेच्या आधारे हा दंड करण्यात आला. यातून बँकांनी त्यांच्या ग्राहकांद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता दर्शवण्याचा हेतू नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply