Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेजारी खायला महाग..! पाकिस्तानात एक किलाे साखर 110 रुपये, महागाईने जनतेची होरपळ, पाहा कशामुळे आलीय ही वेळ..?

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील महागाईचा दर तब्बल 12 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. अवघ्या एक किलो साखरेसाठी तेथील जनतेला तब्बल 110 रुपये मोजावे लागत आहेत, तर एक किलो गव्हाच्या पीठासाठी 96 रुपये द्यावे लागत आहेत.

Advertisement

पाकिस्तानमधील महागाई ऑगस्ट 2019 पासून मोठ्या प्रमाणावर वाढली. भारत-पाकिस्तानमधील कमी झालेला व्यापार हेच त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अनेक जीवनावश्‍यक वस्तूंसाठी पाकिस्तान हा भारतावरच अवलंबून आहे.

Advertisement

मोदी सरकारने 2019 मध्ये काश्‍मीरमधील कलम 370 मागे घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर निर्बंध लादले. मात्र, त्यांचा हा निर्णय बुमरॅंग झाला असून, पाकिस्तानलाच मोठा फटका बसत आहे.

Loading...
Advertisement

पाकिस्तानला लागणाऱ्या एकूण औषधांपैकी 40 टक्के गरज फक्त भारतच पूर्ण करतो; पण आता भारतातून आयात थांबल्याने दोन रुपयांच्या औषधांच्या गोळीसाठी पाकिस्तानी जनतेला तब्बल २० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळेच पाकिस्तानातील औषध उत्पादकांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन भारतातून आयात होणाऱ्या औषधांवर बंदी उठविण्याची मागणी केली होती.

Advertisement

भारतातून औषधांची आयात न केल्यास पाकिस्तानातील औषधांच्या किमती तब्बल 45 टक्के वाढण्याचा धोका आहे. अनेक महत्त्वाच्या आजारांवरील औषधे, लसी पाकिस्तानला भारताकडून खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानला दोन पावले मागे घेऊन भारतासोबतचे व्यापारी संबंध पूर्ववत करावे लागणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply