Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तफावत चक्क १५० पटीची की..! राष्ट्रपतींच्या वेतनमुद्द्याच्या निमित्ताने हेरंब कुलकर्णी वेधले महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष..!

Please wait..

नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याच्या पगाराची तुलना शिक्षकांशी करतानाच होणारी मोठी करकपात लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरून सध्या ते जोरदार चर्चेत आहेत. त्याचेवली देशात मिळणारे अनियमित वेतन आणि अनेकांचे जगण्याचे प्रश्नही यानिमित्ताने चर्चेत आलेले आहेत. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी यानिमित्ताने आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.

Advertisement
Loading...

https://www.facebook.com/photo?fbid=947547172485620&set=pcb.947545865819084

Advertisement

त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, राम मनोहर लोहिया म्हणायचे की देशातील पहिला नागरिक व शेवटचा नागरिक यांच्या वेतनात फक्त १० पट अंतर असावे..आज संजय गांधी निराधार योजनेतल्या शेवटच्या माणसाला महिन्याला १०००रु पेन्शन मिळते तर राष्ट्रपती या पहिल्या नागरिकाला दीड लाख रुपये पेन्शन मिळते. दोन्हीतील तफावत १० पट नाही तर १५० पटींची आहे,ही दरी पेन्शनची आहे … उत्पन्नातील दरी वेगळीच..! त्यांनी पुढे काही माहिती देताना म्हटले आहे की,

Advertisement

Advertisement
राष्ट्रपती भवन वार्षिक खर्च ८० कोटी
राष्ट्रपती वेतन खर्च ६० लाख
कर्मचारी खर्च ३२.७८ कोटी
राष्ट्रपतीभवन खर्च ४७.६० कोटी
एकूण खर्च जवळपास ८० कोटी
दीड लाख निवृत्तीवेतन
पत्नीला मासिक खर्चाला ३०००० रुपये
निवृत्तीनंतर स्टाफ खर्च ६०,००० रुपये

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply