Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्यांना’ मिळाले लाखाचे ६.७० लाख; पहा वर्षभरात कसे झालेत थेट पाचपट पैसे..!

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जोखमीचेच काम आहे. धोका पत्करण्याची तयारी ठेऊनच येथे पैशांची गुंतवणूक करावी लागते. प्रत्येक वेळी फायदाच होईल याची शाश्वती नसते. काही वेळेस नुकसान सोसण्याचीही तयारी ठेवावी लागते. काही वेळा अशाही येतात की गुंतवणूकदार मालामाल होतात. आताही एका कंपनीच्या शेअरनने गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करुन दिली आहे. अवघ्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे.

Advertisement

Advertisement

लॉरेस लॅब असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना चांगलीच कमाई करुन दिली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात कंपनीने गुंतवणूकदारांना ५६० टक्के रिटर्न्स दिले आहेत. २९ जून रोजी या कंपनीच्या इक्विटी शेअरची किंमत १०३ रुपये होती. त्यानंतर आज फक्त एक वर्षाच्या काळातच शेअरची किंमत ६७८.९० रुपये इतकी झाली आहे. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये लॉरस लॅब ६८२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास ५५९ टक्के परतावा मिळवून दिला आहे.

Loading...
Advertisement

कोरोना संकटात देशाचे मोठे नुकसान झाले. असे एकही क्षेत्र नसेल ज्यास या संकटाचा फटका बसला नसेल. या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेस सुद्धा मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार सुद्धा यास अपवाद नाही. या संकटात शेअर बाजार सुद्धा भरडला गेला. या काळात शेअर बाजार हेलकावे खात होता. कधी जास्त तर कधी कमी अशी परिस्थिती होती. आता मात्र, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर शेअर बाजार सावरला आहे. या क्षेत्रास कोरोनाचा फारसा फटका बसलेला दिसत नाही. कारण, शेअर बाजाराची घोडदौड सुरू आहे. आता देखील बाजारात तेजी दिसून येत आहे. कारण, वर्षभराच्या काळात काही कंपन्यांच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply