Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नगरमध्ये झालाय मोठा कांदा घोटाळा; ‘त्यांच्या’ नातेवाईकांनी लाटले दणक्यात अनुदान..!

अहमदनगर : नाफेडच्या कांदा घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट अहमदनगर जिल्ह्यात आलेले असल्याचे उघड झालेले आहे. शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणाऱ्या कांदा खरेदी योजनेद्वारे काही मोजक्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आणि त्यांच्या नातेवाईक यांनी दणक्यात अनुदान लाटल्याची धक्कादायक बाब पुढे आलेली आहे. याप्रकरणी केलेल्या तक्रारीवर पुढे काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे (रा. वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नाफेड आणि इतर संलग्न विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, शेतकरी आणि ग्राहक दोघांवर हा अन्याय करणारा हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. याप्रकरणी कांद्याच्या वजनातील निर्धारित घट व कांदा खरेदी केंद्रनिहाय दाखवलेली घट यामधील फरकाची वसुली करून ज्या खरेदी केंद्रांवर भ्रष्टाचार झाला त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

सरपंच, उपसरपंचांच्या सह्यांच्या छापील दाखल्यांवर खराब कांदा दाखवून खोटे पंचनामे केल्याचा धक्कादायक प्रकारही यानिमित्ताने उघड झालेला आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे पत्र मिळवून मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ढवळे यांनी केलेला आहे. यावर दिव्य मराठी यांनी बातमीत थेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांचे नाव असलेले आणि काही जागा रिकाम्या सोडलेले पत्रच प्रसिद्ध केले आहे.

Advertisement

महाएफपीसी या फेडरेशनद्वारे सन २०१८-१९ या कालावधीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत नाफेडसाठी कांदा खरेदी करण्यात आल्यावर खराब कांदा दाखवून शासकीय निधी लुटणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेला कांदा भाड्याने घेतलेल्या कांदा चाळीत साठवण्याच्या योजनेतही घोळ असल्याकडे तक्रारीत लक्ष वेढलेले आहे.

Loading...
Advertisement

Advertisement

कांदा चाळींमध्ये ठेवण्यासाठी “नाफेड’तर्फे प्रति क्विंटल १०० रुपये क्विंटल या दराने चाळीचे भाडे देण्यात येते. त्याशिवाय कांद्याची वर्गवारी, प्रतवार आणि चाळीत माल भरणे यासाठी ५० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे निधी देण्यात येतो. काही ठिकाणी गोण्या भरण्यासाठी ५० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे स्वतंत्र पैसेही देण्यात आले. अशाप्रकारे खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक व देखरेख यासाठी प्रतिक्विंटल २०० ते २५० रुपये अनुदान देण्यात येते. अहमदनगर जिल्ह्यातील या खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नातलगांच्या नावे खोट्या चाळी दाख‌ून हे भाडे व इतर निधी लाटल्याचे पुरावे या तक्रारीद्वारे शासनास कळविण्यात आले आहेत, असे बातमीत म्हटलेले आहे.

Advertisement

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply