Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्या-चांदीच्या भावात वाढ.. जागतिक बाजारात घसरण, सराफ बाजारातील आजची स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरून 1776 डॉलरवर, तर चांदीचा दर 26 डॉलरच्या स्तरावर असताना भारतीय सराफ बाजारात मात्र उलट स्थिती दिसून आली.

Advertisement

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (सोमवारी) सोन्याच्या भावात 116 रुपये, तर चांदीचा भाव 161 रुपयांनी वधारला. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा दर 46,337 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाला. चांदीही 161 रुपयांनी वधारुन 67,015 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Advertisement

सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी घसरला होता. मात्र, बाजार बंद होताना 1 पैशांच्या मजबूतीसह 74.19 च्या स्तरावर बंद झाला.

Loading...
Advertisement

देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ दिसून आली. ‘एमसीएक्स’वर सायंकाळी 5.21 वाजता ऑगस्ट डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 6 रुपयांनी वाढून 46931 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर ऑक्टोबरमध्ये सोन्याचा भाव 20 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 47229 रुपये स्तरावर पोचला होता.

Advertisement

‘एमसीएक्स’वर चांदीच्या भावात किंचित घसरण पाहायला मिळाली. जुलैच्या डिलीव्हरीसाठी चांदीचा दर 96 रुपयांनी घसरून 67777 रुपये प्रति किलो राहिला, सप्टेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदी 80 रुपयांनी घसरून 68870 रुपये प्रति किलो, डिसेंबरच्या वितरणासाठी चांदी 515 रुपयांनी घसरून 70353 रुपये प्रति किलोवर व्यापार करीत होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply