Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा आणखी एक कटू निर्णय, गुंतवणुकदारांचे होणार मोठे नुकसान, जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : गेल्या वर्षी मोदी सरकारने बँकांमधील मुदतठेव योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मोदी सरकार आणखी एक कटू निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता मोदी सरकार अल्पबचत याेजनांवरील (Small Saving Schemes) व्याजदरही कमी करणार असल्याची माहिती मिळाली. येत्या 1 जुलैपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता.  मात्र, आता त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मिळाली. अर्थखात्याने एप्रिलमध्येच या निर्णयाची घोषणा केली होती. मात्र, त्यामुळे भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. राजकीय नुकसान टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने एका रात्रीत हा निर्णय रद्द केला होता.

Advertisement

अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटल्यास सामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान होणार आहे. अधिक व्याजदरासाठी आता संबंधित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. याशिवाय, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), मासिक उत्पन्न योजना (MIS) अशा योजनांमध्ये 1 ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करुन चांगले व्याज मिळविता येणार आहे.

Loading...
Advertisement

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (1 एप्रिल ते 30 जून 2021) नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर 0.7 टक्क्याने कमी करून 6.4 टक्क्यांवर आणण्यात आला होता.

Advertisement

पोस्टाच्या बचत खात्यावरील वार्षिक व्यादजर 4 टक्क्यावरुन 3.5 टक्के करण्यात आले होते. एक वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5.5 वरून 4.4 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज 7.4 वरून 6.5 टक्के करण्यात आले होते.

Advertisement

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 6.8 वरून 5.9 टक्के, तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 6.2 टक्के करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply