Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पुढाऱ्यांच्या नाड्या आवळल्या.. रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : नागरी बॅंकावर सातत्याने राजकारणी नेतेमंडळींचे वर्चस्व राहिले आहे. हे पुढारी राजकीय गणिते समोर ठेवून आपल्या बगलबच्च्यांनाच मनमानी कर्जवाटप करीत. नेता पाठीमागे असल्याने हे बगलबच्चे कधीही कर्जफेड करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. बॅंकांची कर्जवसुली होत नाही.

Advertisement

सामान्य गुंतवणूकदार, ठेवीदारांच्या पैशांवर उभ्या राहिलेल्या अनेक नागरी बँका या धोरणांमुळे तोट्यात गेल्या नि कालांतराने बुडाल्या. पुढाऱ्यांना त्याचे काय..? त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. ही बाब लक्षात आल्यावर आता रिझर्व्ह बँकेने या पुढाऱ्यांचा नागरी बँकांमधील हस्तक्षेप थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार, आगामी काळात आमदार, खासदार वा नगरसेवकांना नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, तसेच पूर्ण वेळ संचालक होता येणार नाही. तशी अधिसूचनाच आरबीआय (RBI)ने काढली आहे. या निर्णयामुळे सहकारी आणि नागरी बँकांतील घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचे बाेलले जाते.

Advertisement

नागरी सहकारी बँकांवरील व्यवस्थापकीय संचालक, तसेच पूर्ण वेळ संचालक पदावरील व्यक्ती शैक्षणिकदृष्टय़ा अर्हताप्राप्त असावी, असाही दंडक करण्यात आला आहे. महापालिका वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य, राजकारण्यांनाही या पदावर आता राहता येणार नाही.

Loading...
Advertisement

संचालक पदावरील व्यक्ती स्नातकोत्तर पदवीधारक (Post graduate), वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल (​कॉस्ट अकाऊंटट) किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक असणे आवश्यक केले आहे.

Advertisement

व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती ही 35 वर्षांपेक्षा कमी, तसेच 70 वर्षांपेक्षा अधिक वयाची नसावी. तसेच या पदावर एकाच व्यक्तीने 15 वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये, असेही सांगण्यात आले आहे.

Advertisement

एका व्यक्तीला या पदावर सलग तीन अथवा पाच वर्षांपर्यंत राहता येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply