Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाप रे..! 5 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या, पाहा कुठे केलीय पोलिसांनी ही कारवाई..?

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील बालाघाट परिसरातून पोलिसांनी तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली. पैकी 6 आरोपी बालाघाटचे, तर 2 आरोपी गोंदियाचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील बालाघाट, तसेच महाराष्ट्रातील गोंदिया भागात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

Advertisement

मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट सुरू असल्याची माहिती बालाघाट पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी गुप्त मोहीम राबविताना एकाला 8 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह जेरबंद केले.

Advertisement

पोलिसी खाक्या दाखविताच हा आरोपी पोपटासारखं बोलू लागला. बालाघाट आणि गोंदियातील ठिकाणांची माहिती त्याने पोलिसांना दिली. बालाघाट पोलिसांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून 8 जणांना अटक केली.

Loading...
Advertisement

दरम्यान, या वर्षीच्या मार्च महिन्यातही पोलिसांनी बनावट नोटा खपविण्याच्या तयारीतील चौघांना अटक केली होती.  त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 94 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. आताच्या 5 कोटींच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा त्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Advertisement

पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांमध्ये 10 रुपये ते अगदी 2 हजार रुपयांपर्यंतच्या बनावट नोटा आहेत. विशेषत: त्यात 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या अधिक आहे.

Advertisement

बनावट नोटांचा वापर नक्षलवाद पसरविण्यासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर आणि गोंदिया या भागात या प्रकऱणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply