Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार गॅसच्या किमती वाढविण्याच्या विचारात, महागाईत दरवाढीचा तडका, गृहिणींचे बजेट कोलमडणार..!

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वैतागलेल्या नागरिकांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. मोदी सरकार लवकरच घरगुती गॅसच्या किमती वाढविण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महागाईत गृहिणीचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. LPG गॅसच्या किमतीत 60 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार सरकार 1 ऑक्टोबरपासून घरगुती गॅसच्या किमती वाढविणार असल्याचे समजले.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात नॅचरल गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम घरगुती गॅसच्या किमतीवरही झाला आहे. भारतातील सरकारी कंपनी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने नॅचरल गॅसच्या किमतीत जवळपास 60 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम तेल कंपन्यांच्या रेव्हेन्यूवरही होऊ शकतो. सरकारने एलपीजी गॅसवर मिळणारी सबसिडी काही दिवसांपूर्वी संपुष्ठात आणली. त्यानंतर एलपीजीवर मिळणाऱ्या सबसिडीेचे वहनही तेल कंपन्यांना करावं लागत होतं.

Loading...
Advertisement

जानेवारी ते मार्च 2021 मध्ये ONGC तेल कंपनीने 58.05 डॉलर प्रति बॅरल दराने कच्च्या तेलाची विक्री केली. काही दिवसांपूर्वी ग्राहकांना मिळणारी सबसिडी संपुष्टात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या. त्यानंतर कंपनीला 6734 कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याचे ONGC चे अध्यक्ष सुभाष कुमार यांनी सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply