Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार व भत्ते वाढीबाबत नवा खुलासा, पाहा केंद्र सरकारने काय म्हटलंय..

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार व भत्ते 1 जुलैपासून वाढणार असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आली होती. मात्र, आता याबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद औट घटकेचाच ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

केंद्रिय कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनातील डियरनेस अलाऊन्स (DA) व डियरनेस रिलीफ (DR) भत्ते वाढविण्यासंदर्भात काल (शनिवारी) दिल्लीत महत्वाची बैठक झाली. तीत कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता व थकबाकी देण्यासंदर्भात मोठी चर्चा झाली.

Advertisement

दरम्यान, बैठकीनंतर केंद्र सरकार 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते वाढवणार असल्याच्या पोस्टस् सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. त्यासाठी केंद्रीय अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथन यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठीचा दाखला दिला जात होता.

Loading...
Advertisement

चिठ्ठीत म्हटले होते, की सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबितभत्ते (DA आणि DR) केंद्र सरकार 1 जुलैपासून पुन्हा सुरु करणार आहे. हे भत्ते प्रलंबित असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सची जमा झालेली थकबाकीही अदा केली जाईल. केंद्र सरकार तीन टप्प्यात ही थकबाकी देणार असल्याचे नमूद केले होते.

Advertisement

दरम्यान, काही वेळानंतर #PIBFactCheck मध्ये ही चिठ्ठी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. केंद्र सरकारने अद्याप कर्मचाऱ्यांचे भत्ते किंवा थकबाकीसंदर्भात कोणतीही घोषणा केली नसल्याचे त्यानंतर समोर आले. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे PIB कडून स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply