Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विमा कंपन्यांना ‘अच्छे दिन’..! ‘मॅक्स लाईफ’ मालामाल, पाहा आर्थिक वर्षात किती प्रगती केलीय..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे नागरिकांना आरोग्य विम्याचे महत्व पटू लागल्याचे दिसत आहे. रुग्णालयांची अव्वाची सव्वा बिले पाहून अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. आता अनेक जण आरोग्य विमा काढू लागले आहेत. त्याचा परिणाम विम्या कंपन्यांच्या उत्पन्नावरही झाल्याचे दिसत आहे.

Advertisement

अशा कंपन्यांपैकी एक असणारी ‘मॅक्स लाईफ इन्शुरन्स’ कंपनी मागील काही दिवसांत मालामाल झाली आहे. ग्राहकांना योग्य संरक्षण आणि योग्य रकमेचा विमा विकत घेण्याचे महत्त्व समजून सांगण्यासाठी मॅक्स लाईफ इन्शुरन्स’ मदत करते. त्यामुळेच वैयक्तिक विमा रकमेत कंपनीची दमदार वाढ झाली आहे.

Advertisement

‘मॅक्स लाईफ’ कंपनीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच वैयक्तिक विमा प्रकारात दोन लाख कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वैयक्तिक सुरक्षाविम्यातील सरासरी रकमेत १० टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा ८१ लाखांवर पोहोचला. याच आर्थिक वर्षात मॅक्स लाईफने विम्याच्या रकमेत मागील वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ अनुभवली. ही रक्कम ३५ लाखांवर पोहोचली आहे.

Loading...
Advertisement

वैयक्तिक विम्यासंदर्भात बाजारपेठेतील १६ टक्के बाजारवाट्यासह पहिल्या १० खासगी जीवनविमा कंपन्यांमध्ये ‘मॅक्स लाईफ’ला स्थान मिळवणे शक्य झाले. मागील पाच आर्थिक वर्षांत वैयक्तिक विमा रकमेच्या विभागात ३३ टक्के, असा दमदार कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट (सीएजीआर) कंपनीने गाठला आहे.

Advertisement

योग्य विमा रक्कम देण्याची बांधिलकी जपत ग्राहकांना त्यांच्या आयुष्याचे योग्य मूल्य समजून घेण्यात, त्याचे महत्त्व जपण्यास साह्य करणे, हे ‘मॅक्स लाईफ’चे उद्दिष्ट आहे. विमा रकमेसंदर्भात ‘मॅक्स लाईफ’ सातत्याने सुधारणा करीत आहे. भविष्यातील आव्हानांवर मात करण्यात साह्यकारक असे ठोस आर्थिक संरक्षण देण्यावर कंपनीचा भर असल्याचे दिसून येते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply