Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लागा तयारीला.. पेट्रोलला येणार ‘अच्छे दिन’; सामान्यांना बसणार १२५ च्या स्पीडचा झटका..!

मुंबई : सध्या केंद्र आणि राज्य सरकारांचा मूड आणि जागतिक बाजारातील परिस्थिती पाहता इंधनाचे दर कमी होणार नाहीत. उलट, आधिकच वाढत जाणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आज क्रूड तेल ७६ डॉलरपर्यंत पोहोचले आहे. या किमती आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कोरोना काळात केंद्र सरकारचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे सरकार इंधन दरात कपात करेल याची शक्यता कमीच आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर १२५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement

देशात इंधनाचा भडकाच उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोजच वाढत आहे. दरवाढ कमी करण्याची मागणी होत असली तरी सध्याची परिस्थिती पाहता सरकार किमती कमी करण्याच्या मूडमध्ये आजिबात नाही. आता तर तज्ज्ञांनीही आगामी काळात इंधनाच्या किमती कमी न होता आणखी वाढण्याचाच इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना किमती कमी होण्याचा विचार सोडून जास्त पैसे मोजण्यास तयार रहावे लागणार आहे. एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर देशात सातत्याने इंधनाच्या किमती वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल ३० वेळा वाढ झाली आहे. अजूनही भाववाढ सुरुच आहे. या भाववाढीमुळे पेट्रोल ७.४४ तर डिझेल ७.५२ रुपयांनी महागले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे. यावेळी पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल आणि डिझेलवरील करांतून मिळाले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल ५.२५ लाख कोटी रुपये सरकारने कमावले आहेत. याच वेळी प्राप्तिकरातून मात्र सरकारला ४.६९ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट करातून ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. तसेच या काळात केंद्र सरकार अनेक जन कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांसाठी सुद्धा मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या दर कमी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply