Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता भुर्र उडवा इलेक्ट्रीक स्कूटर दणक्यात; कारण, मोदींनी दिलीय ‘ही’ महत्वाची संधी..!

दिल्ली : वाढते प्रदूषण आणि वाढत जाणारे इंधनाचे भाव या मोठ्या संकटांतून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळेच तर आता इलेक्ट्रीक वाहनांचा स्वस्त आणि तितकाच सोपा पर्याय समोर आला आहे. होय, यामागे कारणही तसेच आहे. एकतर सरकारने आता या वाहनांना प्राधान्य देण्याचे निश्चित केले. त्यामुळे या वाहनांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी काही निर्णय सुद्धा घेतले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. आजच्या घडीस जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अगदी कमी किमतीत दुचाकी खरेदी करता येईल. कारण, मोदी सरकारने असाच एक भन्नाट निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटीत मोठी कपात केली आहे. या वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. काही नियमातही बदल केले आहेत, त्यामुळे ही इलेक्ट्रिक वाहने आता अधिक स्वस्त होणार आहेत. सरकारने काही नियमात सुद्धा बदल केला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर जास्त अनुदान मिळेल. याआधी इलेक्ट्रिक दुचाकींसाठी प्रति KWH 10 हजार रुपये अनुदान मिळत होते. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर दुचाकी कंपन्यांनी किमती कमी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिव्हिएस कंपनीने ‘TVS iQube’ या इलेक्ट्रॉनिक स्कूटरची किंमत कमी केली आहे. तर Okinawa कंपनीने ‘Okinawa ipraise+’ या दुचाकीची किंमत कमी केली आहे. Revolt Motors कंपनीच्या ‘RV 400’ इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या किमतीत सुद्धा मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या इलेक्ट्रीक दुचाकी आता आधिक कमी किमतीत मिळणार आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, प्रदूषणच्या समस्येने आज पर्यावरणाचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. शहरांमध्ये तर मोकळा श्वास घेणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. मानवी आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण कमी करा, असे कितीदा कानीकपाळी ओरडून सांगितले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. ज्यावेळी प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, त्याचवेळी प्रदूषणात बेसुमार वाढ होत आहे. जागतिक तापमान वाढ, प्लास्टिकच्या कचऱ्यात वाढ, भीषण दुष्काळ अशा अनेक संकटांना आज तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता हे संकट कमी करण्याचे शहाणपण सुचले आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण पूर्णपणे कसे बंद करता येईल, याचा विचार सुरू झाला आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्याच्या योजना तयार केल्या जात आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply