Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

खान सरकारला झटका; फ़क़्त चीनचाच पाठींबा, अर्थकारणाला बसणार फटका..!

दिल्ली : इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या फंदात पडलेल्या पाकिस्तानला आता त्यांनीच खोदलेल्या खड्ड्यात अडकून पडण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. कारण, दहशतवाद्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावर आता या देशाची जागतिकदृष्ट्या आर्थिक कोंडी झालेली आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या या देशाला आता जागतिक मदत मिळण्याचा मार्ग अजूनही खुला झालेला नाही.

Advertisement

त्याला निमित्त घडले आहे ते फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे यादीचे. होय, एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेयर यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात काळ्या यादीतील हाफिज सईद, मसूद अझहर यासारख्या दहशतवाद्यांवरील कारवाईत अयशस्वी ठरला आहे. दहशतवादाच्या विरोधातील पाकिस्तानच्या कारवायांबाबत बैठकीत सहभागी पाच देशांपैकी चार देशांनी नाराजी व्यक्त केल्याने पाकला ग्रे यादीतच ठेवले जाणार आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

पाकिस्तानला जून २०१८ मध्ये ग्रे यादीत समाविष्ट करण्यात आले असून ऑक्टोबर २०१८ व फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या आढाव्यातही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. आताच्या बैठकीत पाकिस्तानला केवळ चीनचा पाठिंबा मिळाला. चीन, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व भारत यांच्या प्रतिनिधींचा सहभाग या बैठकीत होता. यादीतून बाहेर न पडता आल्याने पाकिस्तानने उलट भारतावर आरोप केले आहेत.

Advertisement

भारत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या राजकीय हितसंबंधासाठी वापर करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. एफएटीएफच्या ग्रे यादीत असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, युरोपीय संघाकडून आर्थिक मदत मिळण्यात अडचण आणि परदेशी गुंतवणुकीतल्या अडचणी आता यामुळे कायम राहणार आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोकेदुखीत त्यामुळे आणखी वाढ झालेली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply