Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सर्रकीचा उडाला दुप्पट भडका.. दुग्धोत्पादकांना मोठाच झटका; म्हणून आणखीही भडका उडण्याची शक्यता..!

नाशिक : जगभरातील पीकपद्धतीचा फायदा-तोटा थेट आपल्यावर होण्याचा हा काळ आहे. जागतिकीकरणाच्या लाटेत शेतीमध्ये कुठेही काहीही बदल झाला की त्याचे परिणाम वस्तीवरच्या शेतकऱ्यांवरही होतात. तसाच झटका आता कपाशीच्या मागणी, पुरवठा आणि लागवड क्षेत्रातील बदलामुळे दुध व्यवसायावर झालेला आहे. जागतिक मागणी आणि पुरवठ्याचे गणित फिस्कटून सध्या वर्षभरात सरकीचे भाव तब्बल दुप्पट झालेले आहेत.

Advertisement

खाद्यतेलांच्या किमती वाढण्याचा परिणाम दूध उत्पादनांवरही दिसत असून मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये सरकीच्या पेंडीचा भाव १,५२२ रुपये प्रतिक्विंटल होता, हा आता दुप्पट उसळीसह ३,००० रुपयांवर गेला आहे. पिकांच्या पेरणीचा कल आणि जगभरात कापसाची मागणी-पुरवठ्याची स्थिती पाहता दीड-दोन महिन्यांत सरकी पेंड ३,५००-३,६०० रुपये प्रतिक्विंटल होईल, असे  अजय केडिया (संचालक, केडिया अॅडव्हायझरी) यांना वाटत आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

सरकीच्या पेंडीत सरासरी ६% तेल असते, हे जनावरांसाठी चांगले मानले जाते.  देशात सध्या सरकी पेंडीचा सरासरी वार्षिक व्यवसाय ७,३०० कोटी रुपयांचा आहे. दूध उद्योग वार्षिक ६.७ % वाढल्याने व्यवसायही वाढेल असे अभ्यासकांना वाटत आहे. वार्षिक ८०-९० लाख टन इतके सरकीच्या पेंडीचे उत्पादन भारतात होते. बहुतांश सरकीच्या पेंडीचा वापर देशातच होतो, केवळ ६० हजार टनाची निर्यात होते.

Advertisement

या हंगामात कापसाच्या जागतिक विक्रीत ११ लाख गाठी वाढण्याची शक्यता आहे. कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने(सीएआय) चालू पीक वर्षात ३३० लाख गाठी कापूस वापराचा अंदाज आहे. गेल्या हंगामात राष्ट्रव्यापी २५० लाख गाठी कापसाचा वापर झाला होता. २५% प्रथिनांमुळे सरकीच्या पेंडीचा उपयोग पशुखाद्याच्या रूपात होतो. देशातील डेअरी उद्योग शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत असल्याने त्यांच्या खर्चात याचा अप्रत्यक्ष वाटा सुमारे ९% आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply