Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घसरणीनंतर शेअर बाजार सावरला..! ‘इन्फोसिस’चा मोठा निर्णय, जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी, अशा दोन्ही निर्देशांकात घसरण झाल्याने गुंतवणुकदार धास्तावले होते. मात्र, त्यानंतर शेअर बाजाराने तेजीची वाट धरली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 226 अंकांनी वधारला, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 69 अंकांची वाढ झाली.

Advertisement

आजच्या सत्रात बँका आणि मेटल शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. त्यात टाटा स्टील, ऍक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को इंडस्ट्रीज, या शेअरमध्ये वाढ झाली. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, एनटीपीसी, एचयूएल हे शेअर घसरणीसह बंद झाले. सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ नोंदवली. सेन्सेक्स 52925 अंकावर स्थिरावला, तर निफ्टी 15860 अंकावर बंद झाला.

Advertisement

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 74.21 वर होता. काल (गुरुवारी) तो 74.16 वर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर आज तेजीसह बंद झाले. मेटल इंडेक्समध्ये 2.79 टक्के वाढ झाली, तर बीएसई एनर्जी इंडेक्समध्ये 1.78 टक्के घसरण झाली.

Loading...
Advertisement

इन्फोसिसची शेअर पुनर्खरेदी योजना आजपासून खुली झाली. या पार्श्वभूमीवर आज कंपनीच्या शेअरमध्ये 1.6 टक्के वाढ झाली. बीएसईवर कंपनीचा शेअर 1575 रुपयांपर्यंत वाढला. इन्फोसिस 9200 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार आहे.

Advertisement

स्थावर मालमत्ता क्षेत्रात आज फिनिक्स मिल, गोदरेज प्रॉपर्टीज, डीएनएफ या शेअरमध्ये वाढ दिसली. इंडिया बुल्स रियाल इस्टेट, नेस्को शेअर घसरणीसह बंद झाले. वाहन उद्योगात मारुती सुझुकी, अशोक लेलँड, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, एस्कॉर्टस, हिरो मोटो कॉर्प या शेअरमध्ये वाढ झाली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply