Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भले शाब्बास..! प्रशासक येताच राज्य सहकारी बँकेने केली दमदार कामगिरी, पहा नेमकं काय केलंय..?

मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य सहकारी बँकेमार्फत वित्तपुरवठा करण्यात येतो. मात्र, 2011 मध्ये ही शिखर बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, या बँकेवर प्रशासक नेमण्यात आले. प्रशासकांच्या देखरेखीखाली राज्याच्या या शिखर बँकेने दमदार कामगिरी केली आहे. राज्य सहकारी बँकेला 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 369 कोटींचा निव्वळ नफा झाला. यंदा नफ्यात 14 टक्के वाढ झाली.

Advertisement

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, की रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष राज्य बँकेने पूर्ण केले आहेत. ‘Well managed and Financially Sound Bank’ या वर्गासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषांपेक्षा बँकेची आर्थिक परिस्थिती जास्त सक्षम आहे.

Advertisement

2020-21 मध्ये बँकेची नेटवर्थ 2703 कोटी असून, त्यात 18 टक्के वाढ झाली आहे. बँकेचा एकूण व्यवहार
43603 कोटींवर गेला आहे. भागभांडवल 619 कोटी, निव्वळ नफा 369 कोटी आणि अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण 1.20 टक्के आहे. बँकेची भांडवल पर्याप्तता 14.34 टक्के आहे.

Loading...
Advertisement

बँकेला गेली 8 वर्षे सतत `अ’ वर्ग प्राप्त होत आहे. शिवाय मागील 7 वर्षांपासून बँक सभासदांना 10 टक्के लाभांश देत आहे. बँकेकडून दरवर्षी 5 कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येत असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बँकांनी ठेवींवरील व्याजदरात मोठ्या प्रमाणावर कपात केली, परंतु राज्य बँकेने वरिष्ठ नागरिकांना ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला. सेवा सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी बॅंकेने योजना तयार केली असून, ती मान्यतेसाठी नाबार्डकडे पाठविली आहे. कर्जाचे नियंत्रण, वसुली व इतर सर्व व्यवस्थापन जिल्हा सहकारी बँकांकडून करणार असल्याचे बँकेचे प्रशासक अनास्कर यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply