Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. मग लुबाडणूकच की..! पहा सरकारी यंत्रणेने कसा घातलाय सामान्यांना हजारो कोटींचा गंडा..?

औरंगाबाद : आपण तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार किंवा पंचायत समितीत किरकोळ-कारकोळ कामासाठी गेलो की कागदपत्रांच्या जंत्री आणि समवेत चिरीमिरी मागितली जाते. ही बाब खूप सामान्य आहे. अशातच आणखी एका मार्गाने सरकारी यंत्रणेने सामान्य जनतेला हजारो कोटींचा गंडा घातल्याचे आता उघडकीस येत आहे. यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, जर असे असेल तर आपण हकनाक राज्य सरकारच्या तिजोरीत हजारो कोटींचा रतीब घातल्याचे उघडकीस येणार आहे.

Advertisement

शासकीय कार्यालयात आवश्यकता नसताना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सक्ती केली जात असल्याचा हा महाघोटाळा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यास आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी याचिकाकर्ता भूषण ईश्वर महाजन हे एलएलबीचे विद्यार्थी असून प्रत्येक ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपर बंधनकारक करण्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

महाजन यांनी माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवली असता त्याची तक्रार त्यांनी महसूल मंत्रालयात केली. परंतु, त्याची दखल घेतली न गेल्यावर त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी न्या. संजय गंगापूरवाला व न्या, एम. जी. शेवलीकर यांनी राज्य शासनाचे प्रधान सचिव, अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे या प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

शासकीय कार्यालयात सादर करायच्या प्रतिज्ञापत्रांसाठी शंभर रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. २००४ पासून शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर देता येते. शासनाने १७ वर्षात वेळोवेळी परिपत्रके काढली. तरी देखील १०० रुपयांचा स्टॅम्पचा वापर होतच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ६ आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे. २००४ ते २०२० पर्यंतच्या १६ वर्षांत प्रत्येकी शंभर रुपयांचे ३९ कोटी ६ लाख ७८ हजार स्टॅम्प पेपर कारण नसताना राज्यभर वापरण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. यास १०० रुपयांनी गुणले तर याचीच किंमत हजारो कोटी होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply