Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात घसरण, चांदी वधारली..! डाॅलरच्या तुलनेत रुपयाची अशी राहिली स्थिती.?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात चढ-उतार सुरु आहेत. मागील दोन दिवस सोन्याच्या भावात मोठी तेजीचे वातावरण होते. मात्र, आज (गुरुवारी) त्यात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात 93 रुपयांची घट होऊन 46,283 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. मात्र, चांदीची चमक आजही कायम असल्याचे दिसले. चांदीची किंमत 99 रुपयांनी वाढून, 66,789 रुपये प्रति किलोवर गेली.

Advertisement

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 9 पैशांनी वाढून 74.18 वर आला. सोन्याच्या किंमती घसरल्याने गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे. काल (बुधवारी) सोन्याची किंमत 110 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 46,396 रुपये झाली होती.

Advertisement

कोमेक्स (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) मधील सोन्याच्या किंमती आणि कमकुवतपणा आणि रुपयाच्या बळकटीमुळे 24 कॅरेट सोन्याच्या किंमती दिल्लीत आज 93 रुपयांनी घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1780 डॉलर आणि चांदीचा भाव 25.96 डॉलर प्रति औंस होता. अमेरिकेचे उत्पन्न आणि डॉलरमधील अस्थिरतेदरम्यान सोन्याच्या किंमती श्रेणीतील मर्यादीत व्यापार करीत असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply