Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेझॉनचा चीनला ‘दे धक्का..’! तीन चिनी ब्रँड्सच्या वस्तू विकण्यास मनाई, पहा चीननं असं काय केलंय..?

नवी दिल्ली – कोरोनासाठी चीनच जबाबदार असल्याचे समोर आल्यापासून चीनवर अनेक देश नाराज झाले आहेत. परिणामी जागतिक व्यापारातही चीनला पीछेहाट सहन करावी लागते आहे. अमेरिकेने अनेक चिनी वस्तूंवर बंदी आणली आहे. त्यात आता ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने तीन चायनिज ब्रँडवर बंदी घातली आहे, म्हणजे या तीन चायनिज ब्रँड्सची विक्री आता अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटेफॉर्मवर करता येणार नाही.

Advertisement

RAV पॉवर बँक्स, (RAVPower power banks), टावट्रोनिक्स इअरफोन (Taotronics earphones) आणि VAVA कॅमेरा (VAVA cameras) यांचा त्यात समावेश आहे.

Advertisement

चायनिज ब्रँडबाबत चांगला ‘रिव्हू’ देणाऱ्या ग्राहकांना चिनी व्यापारी ‘गिफ्ट कार्ड’ देत. चीनमधील ई-कॉमर्स कंपन्यांसाठी ही सर्वसामान्य बाब असली, तरी ‘अ‍ॅमेझॉन’ च्या पॉलिसीनुसार ‘रिव्हू’ पद्धतीवर प्रभाव पाडण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.

Loading...
Advertisement

अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरुन ‘सनव्हॅली’ कंपनी इलेक्टॉनिक्स वस्तू विकते. त्यात लहान मुलांवर लक्ष ठेवणारे कॅमेरे, पॉवर बँक्सचा समावेश आहे. ‘सनव्हॅली’ कंपनीच्या एकतृतीयांश वस्तूंची विक्री अ‍ॅमेझॉनवरुन केली जात होती. अमेझॉनच्या निर्णयामुळे या कंपनीला मोठा फटका बसणार आहे.

Advertisement

सकारात्मक ‘रिव्हिव्हू’साठी गिफ्ट कार्ड देणे किंवा मित्राला चांगले रिव्हिव्हू देण्यास सांगणे, हे अमेझॉनच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉनने तीन ब्रँड्सवर बंदी आणली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply