Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच आहे की…भारतीय गहू आणि तांदळाची विदेशांना पडलीय भुरळ; पहा, किती देशांना होतेय निर्यात

नवी दिल्ली : कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत आली. एका पाठोपाठ एक अनेक संकटे आली, तरी सुद्धा या संकटांचा सामना करत भारताने निर्यातीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. कोरोना काळात अडचणी असतानाही विदेशात धान्य निर्यात करण्यात देश यशस्वी राहिला आहे.

Advertisement

देशात तर धान्याची मागणी वाढतीच आहे. मात्र, विदेशातही भारतीय धान्यास जास्त पसंती देण्यात येत आहे. त्यामुळेच तर २०२०-२१ या वर्षात बासमती तांदूळ, गहू आणि अन्य प्रकारचे धान्य मोठ्या प्रमाणात विदेशात पाठवण्यात आले. विदेशी नागरिकांकडून भारतीय तांदळास आधिक पसंती देण्यात येत आहे. यामुळेच बासमती तांदळाची मागणीही या दिवसात वेगाने वाढत आहे. भारत बासमती तसेच नॉन बासमती तांदळाची निर्यात करतो. सरकारी आकडेवारीनुसार सन २०११८-१९ मध्ये भारताने तिमोर-लेस्ते, प्यूर्टो रिको, ब्राझील, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे, बुरुंडी, इस्वातिनी, म्यानमार आणि निकारागुआ या देशांना १८८ मेट्रिक टन नॉन-बासमती तांदूळ निर्यात केला. यानंतर २०१९-२० मध्ये या देशांना १९७ मेट्रिक टन तांदूळ निर्यात करण्यात आला. परंतु २०२०-२१ मध्ये या देशांच्या निर्यातीचे प्रमाण वाढून १.५३ लाख टन झाले आहे.

Advertisement

तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे विशेषत: जागतिक कोरोना महामारीमुळे बर्‍याच वस्तूंचा पुरवठा बाधित झाला. सरकारने सर्व प्रकारे कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत तांदूळ व इतर धान्यांच्या निर्यातीची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. एपीडाचे अध्यक्ष डॉ. मदन अंगमुथू म्हणाले, की कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमुळे आम्ही सुरक्षितता व स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत, आणि कृषी उत्पादनांची निर्यात बंद होणार नाही, याचे नियोजन केले आहे.

Loading...
Advertisement

भारताने २०२०-२१ दरम्यान येमेन, इंडोनेशिया, भूतान, फिलीपिन्स, इराण, कंबोडिया आणि म्यानमार अशा सात नव्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्यात केली. या सात देशांत सन २०१८-१९ मध्ये गहू निर्यात केला नाही. आणि २०१९-२० मध्ये केवळ चार मेट्रिक टन धान्य निर्यात करण्यात आले. सन २०२० -२१ मध्ये मात्र या देशांना गहू निर्यातीचे प्रमाण १.४८ लाख टनांवर गेले. तांदूळ आणि गहू वगळता अन्य प्रकारच्या धान्य निर्यातीतही भारत मागे नाही. सन २०२०-२१ मध्ये भारताने सुदान, पोलंड, बोलिव्हिया, कोलंबिया, रिपब्लिक ऑफ कांगो आणि घाना या देशांना मोठ्या प्रमाणात धान्य पाठविले. तांदूळ आणि गहू व्यतिरिक्त २०१९-२० मध्ये १०२ मेट्रीक टन धान्य निर्यात केले गेले, ज्यामध्ये २०२०-२१ मध्ये ५२१ मेट्रीक टन वाढ झाली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply