पुणे : प्रशासकीय कामामध्ये सेवा कमी आणि अडचणीची हमी अशीच महाराष्ट्र राज्याची परिस्थिती आहे. सामान्य माणूस असो की ठेकेदार. सगळ्यांना लाल फितीच्या कारभारातून न्याय मिळण्याची खात्री करून घेण्यासाठी पैसे खाऊ घालावे लागतात. तरीही काम होण्याची 100 टक्के खात्री नसते. अशाच पद्धतीने मागील दीड वर्षे अडवणूक केल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या युवा इंजिनीअरने आपली व्यथा मांडताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साद घातली आहे. यावर उपमुख्यमंत्री काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सध्या परदेशात असलेले आणि स्वतः शिवसैनिक असलेल्या वैभव शिंदे या मॅकेनिकल इंजिनीअर तरुणाने आपल्या भावाची व्यथा मांडली आहे. त्यात ट्विटरवर त्यांनी म्हटलेय की, आदरणीय अजितदादा मी गेल्या 8 दिवसापासून तुम्हाला आणि तुमच्या पीए यांना संपर्क करतोय. कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. 2515 योजनेअंतर्गत माझ्या भावाने वनसगाव येथे सभामंडपाचे 2018-19 ला काम पूर्ण केलं आहे. काम होऊन 1.5 वर्ष होऊन गेलं तरीही त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत.
त्यांनी पुढे लिहिले आहे की, भाऊ नवीनच बांधकाम व्यवसायात उतरला होता. त्यात त्याच बिल अडकून गेलं. त्याने गोल्ड लोन, नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन बांधकाम पूर्ण केल. फाईल पूर्ण सबमिट केली. त्याने मंत्रालयात येऊन माहिती घेतली असता आत्ता फाईल तुमच्या विभागात असल्याचे कळाले. बँक व नातेवाईक पैशांसाठी तगादा लावतायेत. तो सध्या पूर्णपणे तणावात वावरत आहे. फाशी घ्यायची वेळ त्याच्यावर आली आहे. उद्या जर त्याने टेन्शनमध्ये येऊन जीवाचे बरं वाईट केलं तर त्याला जबाबदार कोण?? दादा आपण जागेवर निर्णय घेण्यात ओळखले जाता. मी आपणास विंनती करतो की, लवकरात लवकर त्याच बिल द्या.. अन्यथा फाशी घ्यायची परवानगी द्या.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.