Take a fresh look at your lifestyle.

अमेझॉन, फ्लिपकार्टचे फ्लॅश सेल बंद होणार..? सरकार आखणार लक्ष्मणरेषा, ग्राहकावर काय होणार परिणाम..?

कोरोना संकटात ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, त्याचा छोट्या-मोठ्या रिटेल बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे. ग्राहक घरबसल्या शॉपिंग करीत असल्याने दुकाने ओस पडली आहेत.

Advertisement

ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या मनमानी वर्तनाबद्दल अनेक ग्राहक आणि लहान व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. केंद्र सरकारने आता त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकार ऑनलाईन शॉपिंगसाठी लक्ष्मणरेखा आखण्याच्या विचारात आहे.

Advertisement

ई-कॉमर्स संकेतस्थळांवर खरेदीवर अनेकदा भरघोस सूट दिली जाते. त्याच्या आमिषाला ग्राहक बळी पडतात. त्यातून अनेकदा फसवणूकही होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त सूट देणाऱ्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे.

Advertisement

काही ई-कॉमर्स संकेतस्थळांवर विशिष्ट उत्पादनांवरच ‘फ्लॅश सेल’ जाहीर केला जातो. विशिष्ट उत्पादनांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. पारंपरिक ई-कॉमर्स विक्रीवर कोणतीही बंदी नसतील. मात्र, भविष्यात ‘फ्लॅश सेल’ बंद होऊ शकतात.

Advertisement

‘फ्लॅश सेल’ आणि ‘डिस्काऊंट’ कायद्याला धरून असले, तरी विशिष्ट उत्पादनाच्या फ्लॅश सेलबाबत आता विचार करण्याची वेळ आल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले.

Advertisement

ई-कॉमर्स कंपन्यांना क्रॉस सेलिंगची माहितीही ग्राहकांना देणे बंधनकारक केले जाणार आहे. ग्राहकांना एखाद्या विशिष्ट उत्पादनाविषयीच माहिती देऊन संभ्रम निर्माण करु नये, असा नियमही लवकरच येणार असल्याचे समजते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply