शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ‘डीएपी’ खतावरील अनुदानात वाढ, पहा आता किती रुपयांना मिळणार हे खत..?
नवी दिल्ली : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, सध्या शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे. खते-बियाणांची दुकाने गर्दीने फुलली आहेत. केंद्र सरकारने सुरुवातीला खतांच्या किमती वाढविल्याने मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने पुन्हा या किमती कमी केल्या. त्यानंतर आता केंद्र सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘डीएपी’ (DAP) खतावरील अनुदानात प्रत्येक बॅगमागे 700 रुपयांची वाढ केलीय. पूर्वी शेतकऱ्यांना प्रति बॅगमागे 500 रुपयांचे अनुदान मिळत होते. अनुदान वाढविल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर 14,775 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोझा पडणार असल्याचे रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले.
खत विभागाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यात फॉस्फरस आणि पोटॅश आधारित खतांच्या पोषक तत्त्वावरील अनुदानात 2021-22 साठी वाढ करण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारने यापूर्वीच युरिया नसलेल्या खतांच्या अनुदानात कपात केली होती. त्यामुळे तिजोरीवरील 22,186.55 कोटी रुपयांचा भार कमी झाल्याचे मंडाविया यांनी सांगितले.
यंदाच्या आर्थिक वर्षात नायट्रोजन आधारित खतांवरील अनुदान 18.78 रुपये प्रति किलो, फॉस्फरसवर आधारित खतांवर प्रति किलो 14.88 रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोटॅशला प्रतिकिलो प्रतिकिलो अनुदान 10.11 रुपये प्रतिकिलोवर देण्यात आले आहे, तर सल्फरला प्रति किलो अनुदान 2.37 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
2019-20 मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो प्रतिकिलो 18.90 रुपये, फॉस्फरस 15.21 रुपये, पोटॅश 11.12 रुपये, त्याचप्रमाणे गंधकातील प्रति किलो अनुदान 6.66 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक| ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.