दिल्ली : जगात आज प्रदूषणाची समस्या वेगाने वाढत आहे. कार्बन डायऑक्साइड आणि अन्य घातक वायूंनी पर्यावरण धोक्यात आणले आहे. या प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर अगदीच वाईट परिणाम झाला आहे. मोठ्या शहरात प्रदूषणाची समस्या आधिकच गंभीर बनत आहे. विकसित देशांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यातुलनेत भारताकडून मात्र प्रदूषण वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
देशाने मागील २०० वर्षांच्या काळात पर्यावरण परिवर्तन फक्त तीन टक्के योगदान दिले आहे. त्यातुलनेत युरोप आणि अमेरिकेने दोनशे वर्षात आणि चीनने तर ४० वर्षात मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन केले, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. पॅरीस करारानुसार विकसित देशांनी नुकसान भरपाई म्हणून विकसनशील देशांना १.१ खरब अमेरिकी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये आयोजित जी ७ देशांच्या संमेलनातही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. युरोप, अमेरिका आणि चीन सारख्या देशांनी जगास आर्थिकदृष्ट्या संपन्न केले मात्र, या देशांनी प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढवले आहे. भारतामुळे मात्र पर्यावरणाच्या परिवर्तनावर फारसा परिणाम झालेला नाही.
पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हटले की यासाठी आधी समस्या शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. जगाला या समस्या माहित नाही असेही नाही. समस्या माहित आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले तर कोट्यावधींचे नुकसान होईल ना.. मग कशाला त्या भानगडीत पडायचे असे म्हणून फक्त समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे म्हणून वेळ मारुन नेण्याचे काम जगातील अनेक देश करत आहेत. विकसित देश यामध्ये आघाडीवर आहेत. मात्र, विकसित देशांच्या या स्वार्थीपणाचा पर्यावरणावर जो व्हायचा तो परिणाम झाला आहेच, हे अगदी स्पष्टच आहे.
अतिप्रमाणात कार्बन डायऑक्साइड व अन्य घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे प्रदूषण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे मानवांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वृक्षांची बेसुमार तोड केल्याने जंगले नष्ट झाली आहेत. त्यामुळे आज जग ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्लास्टिकचा वापर वाढला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याने पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. या प्रदूषणाची पातळी कमी करण्याची आज सर्वाधिक गरज आहे. मात्र, ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.