महागाईच्या मुद्द्यावर भाजपच्या उलट्या बोंबा; पहा विरोधी पक्षांना नेमके काय आव्हान दिलेय मोदींच्या मंत्र्यांनी
दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमतीने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. दर कमी करुना नागरिकांना दिलासा देण्याऐवजी या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. एकमेकांवर आरोप करत जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू आहेत.
इंधनाच्या दरवाढी विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे. केंद्र सरकारवर आरोप करत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाव कमी करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकार मात्र दाद द्यायला तयार नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या शंभर रुपयांच्या पुढे गेल्यानंतर सुद्धा भाव कमी करण्यास तयार नाही. उलट, केंद्र सरकारचे मंत्री काँग्रेसवरच आरोप करत आहेत. आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेसशासित राज्यांनी टॅक्स कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत, असे मंत्री म्हणत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी या मुद्द्यावर मोदी सरकावर जोरदार आरोप करत आहेत. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी काँग्रेलाच उलट सवाल केला. ते म्हणाले, की ‘पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान या काँग्रेशासित राज्यात इंधनाचे दर जास्त का आहेत ?,’ ‘राहुल गांधींना जर इंधन दरवाढीची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांनी इंधनावरील टॅक्स कमी करण्यासाठी काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना टॅक्स कमी करण्यास सांगावे. महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनी इंधन करात कपात केली पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. काँग्रेसशासित राज्यांनी टॅक्स कमी केला पाहिजे मग, भाजपशासित राज्यांचे काय, या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
देशात आजमितीस पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरच्या पुढे गेले आहेत. पेट्रोलियम कंपन्या मनमानी पद्धतीने भाववाढ करत आहेत. दर कमी करण्याचा त्यांचा कोणताही विचार दिसत नाही. इंधनाचे दर सध्या कमी होण्याची शक्यता सध्या नाही. ‘कोरोनाच्या संकटात सरकारचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना पैशांची आवश्यकता आहे,’ असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
दरम्यान, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि भाजप या दोघांवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले, की पेट्रोलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचे भाजप आणि काँग्रेसचा डाव आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. या मुद्द्यावर आम्ही वेळप्रसंगी संघर्ष सुद्धा करू, असे कुमारस्वामी यांनी सांगितले.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.