Take a fresh look at your lifestyle.

खरीपासह शेतकऱ्यांची वणवणही सुरू; पहा नेमके काय सुरू आहे या महाराष्ट्रात

नाशिक : खरीप हंगामात खते आणि बियाणे यांची टंचाई यंदाही कायम आहे. मागील अनेक वर्षे महाराष्ट्रातील ही महत्वाची समस्या सोडवण्यात राज्य सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाल्यावर शेतकऱ्यांची वणवणही सुरू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

याबाबत भाजप आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारची घोषणा.. “2020 वर्ष ‘कृषी उत्पादकता वर्ष’ साजरे करणार,शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खते,बियाणे,पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार” घोषणा हवेतच विरली करोना संकटात जीव धोक्यात घालून खतांसाठी पाच-पाच तास बळीराजा रांगेत उभा. कृषी मंत्री महोदय घोषणेची आठवण तरी आहे का?

Advertisement

कृषीमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी खत आणि बियाणे यांच्या टंचाईवर उपाययोजना केल्याच्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न्याय देण्यात हे सरकार कमी पडलेले आहे. याद्वारे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि त्यांची लुबाडणूक यावर काहीही ठोस कार्यवाही ठाकरे सरकार करू शकलेले नाही. ऐन करोना संकटात त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. आता यावर कोणता तोडगा सरकार काढणार की मागील वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना वाऱ्यावरच सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Pravin Darekar – प्रविण दरेकर on Twitter: “महाविकास आघाडी सरकारची घोषणा.. “2020 वर्ष ‘कृषी उत्पादकता वर्ष’ साजरे करणार,शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खते,बियाणे,पीक कर्ज थेट उपलब्ध करुन देणार” घोषणा हवेतच विरली करोना संकटात जीव धोक्यात घालून खतांसाठी पाच-पाच तास बळीराजा रांगेत उभा. कृषी मंत्री महोदय घोषणेची आठवण तरी आहे का? https://t.co/v7psR1GjXo” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply