Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसने हाणलाय फडणवीसांना ‘त्या’प्रकरणी टोला; शेतीबाबत दिली ती आठवण करून

नाशिक : थोडे वाढवायचे आणि जास्त दिल्याचे दाखवायचे अशी सरकारी नीती अजूनही देशभरात कायम आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आकडेवारी फुगवून दाखवून त्याचेक इव्हेंट करण्यात केंद्र सरकारची यंत्रणा मस्तगुल आहे. असाच प्रकार शेतमाल हमीभाव वाढीच्या बाबत झालेला आहे.

Advertisement

त्याच मुद्द्याकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत ट्विटरवर एक पोस्ट लिहिताना त्यांनी भाजपचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते तसेच माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनाच एक टोला हाणला आहे. फडणवीस हे त्यावेळीही राज्यातील विरोधी पक्षात होते. तसेच देशातील सत्तेत कॉंग्रेस होती. त्यावेळी त्यांनी केलेली मागणी अजूनही पूर्ण कशी झालेली नाही याकडे सावंत यांनी लक्ष वेढलेले आहे.

Advertisement

सावंत यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने आता सोयाबीनला ₹ ३९५० प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. २०१३ ला प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीस जींनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ₹ ६००० प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला ८ वर्षे आणि मोदी सरकारला ७ वर्षे झाली. फडणवीस साहेब ₹ ६००० भाव कधी मिळणार? आता सावंत यांच्या या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस नेमके काय प्रत्युत्तर देणार की अशा अडचणीच्या प्रश्नांवर आपली अळीमिळी गुपचिळी कायम ठेवणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “मोदी सरकारने आता सोयाबीनला ₹ ३९५० प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. २०१३ ला प्रदेशाध्यक्ष असताना @Dev_Fadnavis जींनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ₹ ६००० प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला ८ वर्षे आणि मोदी सरकारला ७ वर्षे झाली. फडणवीस साहेब ₹ ६००० भाव कधी मिळणार?” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply