Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जोर का झटका..! बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनील’वर नेपाळचीही बंदी, पहा काय कारण दिलंय..?

नवी दिल्ली : कोरोना (corona) आजारावर रामबाण उपाय म्हणून योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या ‘पतंजली’ने (Patnjali) ‘कोरोनिल’ या औषधाची निर्मिती केली. हे औषध कोरोनावर 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला. मात्र, मोदी सरकारने त्याच्या वापरास मान्यता दिली नाही. त्यामुळे बाबा रामदेव यांनी शेजारील राष्ट्रांना जवळ केले. नेपाळ, भूतान येथे ‘कोरोनिल’ (coronil) पाठविले. मात्र, नेपाळ (Nepal) सरकारने बाबा रामदेव यांना धक्का देत ‘कोरोनिल’च्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात कोरोनिल औषध प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा दिला नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. नेपाळमध्ये ‘कोरोनिल’चे 1500 किट पाठविले होते. मात्र, त्याच्या खरेदीत योग्य प्रक्रियेचे पालन झाले नसल्याने नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने ‘कोरोनील’ वापरास मनाई केली आहे. त्यामुळे ‘कोरोनिल’चे वितरण तात्काळ थांबविण्यात आले आहे.

Advertisement

बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये कोरोनिलचे 1500 किट मोफत पाठवले होते. मात्र, कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी कोरोनिल औषध अजिबात प्रभावी नसल्याचे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Loading...
Advertisement

अलीकडेच भूतान औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातली होती. मात्र, दुसरीकडे कोरोनिल किट अद्याप नेपाळमध्ये नोंदणीकृत झालेली नाही. त्यामुळे त्याची व्यावसायिक विक्री अथवा वितरण होऊ शकत नाही. नेपाळ सरकारला कोरोनिल किट भेट म्हणून देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण देत आवश्यक इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचे ‘पतंजली’ने म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply