Take a fresh look at your lifestyle.

आणि त्यामुळे हिरावलीय कृषी ‘समृद्धी’; पहा शेतकऱ्यांचे नेमके काय म्हणणे आहे

नाशिक : औद्योगिक आणि व्यावसायिक समृद्धी आणण्याच्या नावाखाली पर्यावरण आणि शेतीमधील समृद्धी हिरावून घेणारे प्रकल्प राबवण्याची सवय महाराष्ट्राला आहे. राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि ठेकेदार मंडळींची मिलीभगत यासाठी अजूनही जोमात आहे. त्याचाच फटका आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना बसत आहे. त्याला निमित्त ठरले आहे समृद्धी महामार्गाचे.

Advertisement

सिन्नर तालुक्यातील वावी, फुलेनगर, घोटेवाडी आणि वल्हेवाडी या चार गावांचा शिवार असलेल्या वावी परिसरातील गटनंबर १००५ मध्ये माती, मुरूम आणि दगड काढण्यासाठी समृद्धीच्या ठेकेदाराकडून उत्खनन सुरू आहे. मात्र, सरकारचे काम करीत असलेल्या या ठेकेदाराने नियमांना बासनात गुंडाळून थेट ५० ते ५५ फुटापर्यंत खोदकाम केले आहे. नियमानुसार केवळ ६ मीटरपर्यंत अशा उत्खननास परवानगी असतानाही या भागातून समृद्धीच्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केलेले आहे.

Advertisement

अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी ७ ते १३ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आल्याचे वावीच्या मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट म्हटलेले आहे. मात्र, पुढे महसूल विभागाने काहीही कारवाई केलेली नाही. या जास्त खोदकामामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याच्या तक्रारी आहेत. एकूणच समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने अनेक शेतकऱ्यांची समृद्धी हिरावण्याचा प्रयत्न करूनही महसूल विभाग शांत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे लेखी तक्रार करून सदरचे खोदकाम तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंचनामा झाल्यावर पुढे काहीही झालेले नाही. पंचनाम्याप्रसंगी तक्रारदार कैलास गुंजाळ, भारत यादव, सुभाष थोरात, भाऊसाहेब भगत आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. इतर अनेक जिल्ह्यातूनही या महामार्गाच्या कामाबद्दल हजारो तक्रारी असताना राज्य सरकारची यंत्रणा अर्थपूर्ण पद्धतीने ढिम्म आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply