भारताच्या अर्जाचा पाकिस्तानला झटका; पहा आता कोणत्या मुद्द्यावर नवा वाद उकरून काढलाय खान सरकारने
दिल्ली : अनेक संकटांनी घेरल्या गेलेल्या पाकिस्तानची मुजोरी मात्र काही केल्या कमी व्हायला तयार नाही. काहीही कारण नसताना हा देश भारतास त्रास देण्याचे कारण शोधतच असतो. या प्रयत्नात मात्र पाकिस्तानचेच जास्त नुकसान होत आहे. भारतास तसाही काही फरक पडत नाहीच. भारत सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान जास्तच अस्वस्थ झाला आहे. भारताने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी हर प्रकारे प्रयत्न करुनही काहीच मिळाले नाही.
या रागाच्या भरात पाकिस्तान असे काही निर्णय घेत आहे, त्यामुळे पाकिस्तानलाच नुकसान सहन करावे लागत आहे. तरी देखील काश्मीरचा मुद्दा पुढे करत काही ना काही वाद उकरुन काढत आहे.
आताही पाकिस्तानने असाच कारनामा केला आहे. बासमती तांदळाच्या विशेष ट्रेडमार्कच्या मुद्द्यावर या दोन्ही देशात वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात बासमती तांदळास विशेष महत्व आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील बासमती तांदूळ आधिक दर्जेदार आणि उच्च गुणवत्तेचा आहे. तांदूळ निर्यातीचा विचार केला तर भारत जगात सर्वात मोठा तांदूळ निर्यातक देश आहे. त्यातुलनेत पाकिस्तान निम्मा सुद्धा तांदूळ निर्यात करत नाही. तरीही पाकिस्तानचा मुजोरपणा काही केल्या त्यास शांत बसू देत नाही. बासमतीच्या विशेष ट्रेडमार्कसाठी (protected geographical indication)भारताने युरोपियन युनियनमध्ये अर्ज केला आहे. मात्र, पाकिस्तानने यास विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत भारताला हा पीजीआय टॅग मिळू नये, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. पाकिस्तानातील व्यापारी सुद्धा यास विरोध करत आहेत. इतकेच नाही, येथील बासमती तांदूळ हा आधिक जैविक आणि चांगल्या गुणवत्तेचा असल्याचाही दावा करत आहे.
दुसरीकडे मात्र भारताने सुद्धा स्पष्ट केले आहे, की हिमालयाच्या परिसरात उगवला जाणारा विशिष्ट प्रकारच्या तांदळाचा एकमात्र उत्पादक असल्याचा दावा अर्जात केलेला नाही. तरी देखील पीजीआय टॅग मिळाल्यानंतर त्यास मान्यता मिळेल. इंडियन राइस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेतिया म्हणाले, की गेल्या ४० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान जगभरात बासमती तांदळाची निर्यात करत आहेत. कधीही वाद झाले नाहीत. आता मात्र दोन्ही देशात स्पर्धा सुरू आहे. तरी सुद्धा पीजीआय टॅग मिळाल्यानंतर काही बदल होईल, असे वाटत नाही. दरम्यान, पीजीआय टॅगचा दर्जा एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील संबंधित उत्पादनांसाठी आहे. एखाद्या विशिष्ट पदार्थासाठी हा टॅग मिळाला तर मग दुसऱ्या कोणासही त्या पदार्थाची नक्कल करत नाही. तसेच या टॅगमुळे संबंधित देशास बौद्धिक अधिकारही मिळतात.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.