Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकातदादांनी दिले ठाकरे सरकारला ‘हे’ आव्हान; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

पुणे : कोरोना पाठोपाठ महागाईने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले आहे. महागाई काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. देशातील संकटांची जाणीव असतानाही पेट्रोलियम कंपन्या अगदीच मनमानी कारभार करत पेट्रोल डिझेल दरवाढ करत आहे.

Advertisement

या मुद्द्यावर काँग्रेस नेते सातत्याने टीका करत आहेत. तसेच या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनेही करत आहे. काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज जोरदार टीका केली. तसेच राज्य सरकारला आव्हानही दिले. ते म्हणाले, की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारने करावी, असे वाटत असते. मात्र, राज्याने याआधी इंधनावरचा कर १० रुपयांनी कमी करावा, त्यानंतर केंद्र सरकाकडे ५ रुपये कर कमी करण्याची मागणी करावी, असे आव्हानच त्यांनी दिले. आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Advertisement

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. तेव्हा पासून खडसे आक्रमकपणे भाजपवर टीका करत आहेत. आताही त्यांनी सध्या भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर मात्र भाजपनेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. नाथाभाऊ आमचे नेते, त्यांनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...
Advertisement

कोरोनाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपमध्ये सध्या अस्वस्थता असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की भाजपमध्ये मतभेद नाहीत, आणि असले तरी ते सोडवण्यास आम्ही समर्थ आहोत. जो पक्ष सोडून जातो त्याने जाईल तेथे सुखी रहा, असे आमचे धोरण असल्याचे पाटील म्हणाले.

Advertisement

दरम्यान, इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. मोदी सरकारच्या काळात टॅक्स वसूली महामारीच्या लाटा सारख्या येत आहेत. सरकारने टॅक्समध्ये वाढ केल्यानेच इंधनाच्या दरात वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन केले होते. इंधन दरवाढीस देशभरातून विरोध होत असतानाही दर कमी करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply